मोदी लाट आटली

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 जुलै 2016

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत युती संपुष्टात येण्याची शक्‍यता आहे; सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची साथ मिळणार नसल्याने भाजपने शहरी भागातील अल्पसंख्याक मतांकडे लक्ष केंद्रित केले असून, विविध योजनांच्या माध्यमातून ही मते खेचण्याची रणनीती आखल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत युती संपुष्टात येण्याची शक्‍यता आहे; सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची साथ मिळणार नसल्याने भाजपने शहरी भागातील अल्पसंख्याक मतांकडे लक्ष केंद्रित केले असून, विविध योजनांच्या माध्यमातून ही मते खेचण्याची रणनीती आखल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अल्पसंख्याकांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम, ख्रिश्‍चन, जैन, पारसी, शिख व बौद्ध यांचा समावेश होतो. नुकताच महाराष्ट्र शासनाने ज्यू धर्मीयांचादेखील अल्पसंख्याकांमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

अल्पसंख्याकांसाठी भारत सरकारच्या मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, गुणवत्ता आधारित शिष्यवृत्ती योजना, मोफत प्रशिक्षण योजना, मदरशांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची योजना, अल्पसंख्याक समाजाच्या संस्था/शाळांसाठी पायाभूत विकास योजना, अल्पसंख्याकबहुल क्षेत्रांसाठी बहुक्षेत्रीय विकास योजना आहेत. गुणवत्ताधारक अल्पसंख्याक मुलींसाठी मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक संस्थांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अनुदान योजना, अशा योजना आहेत.

अल्पसंख्याकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शाळेतील (इ. 5 वी ते 7 वी) उपस्थितीसाठी त्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना, अल्पसंख्याक समाजातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप योजना, अल्पसंख्याकबहुल शाळांमध्ये पायाभूत सोईसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना, अल्पसंख्याकांकडून चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक संस्था दर्जा देण्याची योजना, मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजना, उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अशा शैक्षणिक योजना आहेत. अशा इतरही अनेक योजना राबवून अल्पसंख्याक मते मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

"खडसे पॅटर्न‘ राबविणार
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली होती, मात्र खडसे थोडक्‍यात बचावले. खडसे यांनी नंतर मतदानाचा आढावा घेतला असता,दलित आणि अल्पसंख्याक मतांनी त्यांना तारल्याचे दिसून आले. त्यामुळे अल्पसंख्याक विकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी शहरी भागातील अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये तब्बल 67 कोटींची विकासकामे हाती घेतली. हाच "खडसे पॅटर्न‘ आगामी दहा महापालिका निवडणुकीत राबविण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठांनी घेतल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Modi wave not Effect