हिंदूच्या पाठीशी मोदी ठामपणे राहत नाहीत- उद्धव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहत नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी "सामना‘ला दिलेल्या मुलाखतीतून केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा घालमेल सुरू झाली आहे. दोन्ही पक्षात यामुळे "तू-तू मै-मै‘ सुरू होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहत नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी "सामना‘ला दिलेल्या मुलाखतीतून केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा घालमेल सुरू झाली आहे. दोन्ही पक्षात यामुळे "तू-तू मै-मै‘ सुरू होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

 
देशात नक्की काय सुरू आहे, तेच कळत नाही. नक्की कोण काय करत आहे, तेच समजत नाही. काश्‍मिरमध्ये जो भडका उडाला आहे, त्याला जबाबदार कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. अमरनाथ यात्रा बंद पाडली, हिंदूंनी मार खाल्ला, जवानांवर हल्ले झाले, यावर उद्धव यांनी परखड मत व्यक्त केले. शिवसेनेने सतत हिंदुत्त्वाची कास धरली. आम्ही हिंदुत्त्वासाठी हल्ले सहन करायचे, संकटे अंगावर घ्यायची आणि इतरांनी मात्र मजा मारायची. हे किती दिवस चालणार, असा प्रश्‍न उद्धव यांनी विचारला आहे. सरकार बदलले, पण सर्वसामान्यांचे आयुष्य बदलले काय? त्यासाठी काय करणार आहात? असेही त्यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता विचारले.
 

इथेही पाकिस्तानला अंगावर घेणारी शिवसेनाच आहे. पाकिस्तानचे कलाकार आले, क्रिकेटपटू आले, कुणी पुढारी आले की आजही फक्त शिवसेनाच त्यांना विरोध करते. शिवसैनिकच अंगावर केसेस घेतात. शिवसैनिकांनाच अटक होते. बाकीचे काय करतात? काय गजला ऐकताहेत का पाकचेच खेळ बघायला जातात? पाकिस्तान हा काही एकट्या शिवसेनेचाच दुश्‍मन नाही. काश्‍मिरमध्ये जे काही हिंदू शहीद झाले, ते आमच्या रक्तामांसाचे आहेतच. बाकी इतर राजकीय पक्षांतील हिंदू काय करताहेत? त्यांना हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटते का, असे सवालही उद्धव यांनी विचारले आहेत.

देश रिलॅक्‍स नाही
देश रिलॅक्‍स आहे, असे मला अजिबात वाटत नाही. देश पूर्वीही रिलॅक्‍स नव्हता म्हणून तर मतदारांनी कॉंग्रेसचे राज्य उलथवून टाकले. त्यानंतरही जर देश खरोखरच रिलॅक्‍स असता तर मध्यंतरी काही राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल असे लागले नसते. अनेक मोठ्या राज्यांत दिल्लीत राज्य करणाऱ्या पक्षाचा दारुण पराभव झाला. हे कसले लक्षण मानायचे? कारणे काही असतील हो. पण; जसे तुम्ही महाराष्ट्रात उतरला होतात एका ताकदीने; तिच ताकद, सत्ता, पंतप्रधान तुम्ही या राज्यांतही लावलीच होती ना? मग, निकाल विरोधात गेले हे नागरिक किंवा देश रिलॅक्‍स असल्याचे लक्षण नाही, अशा शब्दांत उद्धव यांनी पंतप्रधान आणि भाजपवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. 

Web Title: Modi's Hindu strongly support the relief : Uddhav