उकाडा कायम आर्द्रता वाढल्याचा परिणाम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

मुंबई - पावसाच्या आगमनाचे वेध लागलेल्या मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला नाही. शहरात आज कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस होते. आणखी दोन दिवस कमाल तापमान 35 अंशांवर राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. 

शहराचे काल कमाल तापमान 34.6 अंश सेल्सिअसपर्यंत होते. त्यामध्ये वाढ झाली आहे. आर्द्रताही वाढल्याने उकाडाही कायम आहे. मुंबईप्रमाणेच उत्तर कोकणातील वातावरणात सध्या बदल होण्याची सध्या शक्‍यता नाही. तर दक्षिण कोकणातील काही भागांत आज पूर्वमोसमी सरी पडल्या. राज्याच्या अनेक भागांत उद्या मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. 

Web Title: moisture increase in heat