

Gastro epidemic in Saide-Jogalwadi ends
sakal
सायदे : जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बोरशेती येथे नागरीकांना प्रथम गॅस्ट्रोच्या साथीने घेरले होते. त्यापाठोपाठ या साथीने हुंड्याचीवाडी येथे डोके वर काढले होते. आठवडाभराच्या आत येथील गॅस्ट्रोच्या विळख्यात 78 रुग्ण अडकले होते. दोन्ही गावात विहिरीतील दुषीत पाणी पिल्याने, गॅस्ट्रोच्या साथीचा फैलाव झाला होता. या रूग्णांवर खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, मोखाडा ग्रामीण रूग्णालय आणि नाशिक च्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ऊपचार करण्यात आले आहेत. यातील केवळ एका रूग्णावर नाशिक च्या रूग्णालयात उपचार सूरू असुन ईतर सर्व रूग्णांची तब्येत ठिक झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.