मोखाड्यातलं भीषण वास्तव! लाकडाच्या ओंडक्यावरून जीवघेणी पायपीट

आतापर्यंत अनेक आदिवासी नागरीक व जनावरांनी गमावले जीव; स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनतर दुर्लक्षित
mokhada villagers use wooden stick for cross vaitarna river in palghar district
mokhada villagers use wooden stick for cross vaitarna river in palghar district sakal

मोखाडा : मोखाड्यात बांधण्यात आलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलाशय, मध्यवैतरणा धरणाच्या खालच्या भागात असलेल्या सावर्डे गावातील आदिवासींना वैतरणा नदीपात्रावर लाकडाचा ओंडका टाकून जीव मुठीत धरून पायपीट करावी लागते आहे. येथील शेकडो नागरीक, विद्यार्थी व चाकरमाण्यांना मध्य रेल्वेचे ऊंबरमाळी स्थानक, खर्डी, शहापुर बाजारपेठ तसेच विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत जाण्यासाठी आणि शेतकर्यांना शेतावर जाण्यासाठी याच ओंडक्यावरून पायपीट करावी लागते आहे. येथुन प्रवास करतांना आतापर्यंत  15  ते  20  नागरीकांना तसेच अनेक जनावरांना जीव गमवावा लागला आहे. अनेकदा मागणी करूनही शासनाकडून येथे लहान पुलं बांधण्यात आलेला नाही. स्वातंत्र्याच्या  75  वर्षांनंतर ही येथील आदिवासींना मुलभुत सुविधांपासुन वंचित रहावे लागले आहे. 

mokhada villagers use wooden stick for cross vaitarna river in palghar district
अर्थसंकल्पाच्या या 5 पंरपरा मोदींच्या कार्यकाळात झाल्या बंद

मुंबई ला पाणीपुरवठा करणार्या मध्यवैतरणा धरण बाळासाहेब ठाकरे जलाशयाच्या वैतरणा नदीलगत वसलेल्या सावर्डे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी नागरीकांनी शहापुर तालुक्याशी नदीपात्रावर ओंडका टाकून संपर्क जोडला आहे. सावर्डे ते पुढे शहापुर तालुक्यातील दापुर कडे जाणारा रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावर असलेल्या नदीपात्रावर पुल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील नागरीकांनी नदीपात्रावर लाकडाचा ओंडका टाकून, आपला जीव धोक्यात टाकुन अनेक वर्षापासून पायी प्रवास करत आहेत.

mokhada villagers use wooden stick for cross vaitarna river in palghar district
भाजपकडून ९९ गुन्हेगारांना तिकीट; अखिलेश यादव यांची खरमरीत टीका

मोखाड्यातील सावर्ड्याच्या 1 हजार 500 लोकवस्ती सह काष्टी, किनिस्ते, पोर्याचापाडा, हट्टीपाडा, दुधगांव व मारूतीचीवाडी येथील तसेच शहापुर तालुक्यातील दापुर, सावरखुट, बांदलवाडी, अजनुप, उटाळा, बोंडारपाडा, काटीचापाडा, कोळीपाडा तसेच नदीपलीकडे शेती असलेल्या आदिवासी शेतकर्यांची या नदीपात्रावरीवरील अरुंद ओंडक्यावरून पायपीट असते. विद्यार्थी शिरोळ आश्रमशाळा, सावरोली आश्रमशाळा तसेच माळ येथील जिल्हा परिषद शाळेत ये - जा करतात. तर याच भागातील चाकरमानी, नाक्यावर काम करणारे कामगार यांना मध्य रल्वे चे ऊंबरमाळी स्थानक गाठुन मुंबई, ठाणे, कल्याण येथे जावे लागते. येथील नागरीकांना खर्डी व कसार्याच्या बाजारपेठेत याच नदीपात्रावरीवरील ओंडक्यावरून जीव मुठीत धरून पायपीट करावी लागते आहे. या जीवघेण्या पायपीटीत आतापर्यंत या भागातील 15 ते 20 नागरिकांनी तसेच अनेक गाय, बैल, वासरू तसेच म्हशींना जीव गमवावा लागला आहे.

mokhada villagers use wooden stick for cross vaitarna river in palghar district
पत्रकार-संपादकाच्या भूमिकेतील महात्मा गांधी!

गेली कित्येक वर्षे ही जीवघेणी पायपीट सुरू आहे. या नदीपात्रावर पुल बांधण्यात यावा, अशी मागणी सावर्डे ग्रामपंचायतीने अनेकदा ग्रामसभेत ठराव घेऊन केली आहे. त्याविषयी मुंबई महानगरपालिका, आमदार आणि खासदारांना निवेदनाद्वारे साकडे देखील घातले आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही येथे पुलं बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे निष्पाप आदिवासी तसेच जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे.

mokhada villagers use wooden stick for cross vaitarna river in palghar district
अमेरिकेला बर्फाच्या वादळाचा तडाखा; अनेक ठिकाणी आणीबाणी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना साकडे...

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात महिलांची नदीपात्रावर लाकुड टाकून पाणी आणण्याची जीवघेणी कसरत पाहुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी महिणाभराच्या आत तेथे लोखंडी पुल बांधुन दिला आहे. वैतरणा नदीपात्रावर लाकडाचा ओंडका टाकून या भागातील शेकडो नागरीक अनेक वर्षांपासून प्रवास करत आहेत. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. शासनाने आतापर्यंत आम्हाला दुर्लक्षित ठेवले आहे. बाळासाहेब ठाकरे नंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मोखाडा आणि शहापुर तालुक्यावर विशेष प्रेम कायम आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुलं बांधण्याची, ज्या जलदगतीने पर्यावरण मंत्र्यांनी तत्परता दाखवली तशीच तत्परता याठिकाणी पुलं बांधुन दाखवावी, अशी मागणी सावर्ड्या चे सरपंच हनुमंत पादिर यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com