रुग्णालयातच झाला रुग्ण मुलीचा विनयभंग 

किरण घरत
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

कळवा : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या सोळा वर्षीय मुलीचा 39 वर्षीय सफाईकामगाराने विनयभंग केल्याची घटना शनिवार (ता. 22) रात्री घडली. कळवा पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायाल्याने त्याला आठ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

पिडित मुलगी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला लवकर आराम मिळावा व तिच्यावर शस्त्रक्रिया करावी म्हणून तिला संबधीत आजरावर निदान होण्यासाठी शुक्रवारी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात रुग्णाच्या व परिचारिकांच्या मदतीसाठी अवजड कामासाठी पुरुष साहाय्यक कर्मचारी यांची गरज असते. त्या नसार या रुग्णालयात गेल्या तीन वर्षा पासून सफाई कामगार म्हणून कंत्राटी कामगार म्हणून दिनेश कोळी(कोपरी) हा काम करतो. शुक्रवारी रात्री पिडित मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्या बेड जवळ जाऊन अश्लील चाळे करून या मुलीला त्याने विनयभंग केला. हा प्रकार तिच्या नातेवाईक यांना समजल्यावर त्याला तेथे नातेवाईकानी चोप दिला.  कळवा पोलिसांत तक्रार दाखल केली. कळवा पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने आठ दिवसाची कोठडी सुनावली आहे.

रुग्णालयात गेल्या सहा महिन्यातील दुसरी घटना असून सहा महिन्यांपूर्वी रुग्णालयातील औषध भांडारगृहात फार्मासिस्टच्या जागेवर गोळ्या औषधे देणाऱ्या सफाई कामगाराने त्याच्या ओळखीच्या महिलेसोबत अश्लील चाळे करताना रुग्णालयाच्या सीसी टीव्ही फुटेज वरून क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे रुग्णालयाची सुरक्षा धोक्यात आली होती. तेव्हा तेथील प्रशासनाने या कर्मचाऱ्याची तेथून तातडीने दिवा प्रभाग समितीच्या घनकचरा विभागात बदली करण्यात आली होती. रुग्णालयात पुन्हा अशी घटना घडल्याने रुग्णाची सुरक्षा घोक्यात आली आहे.
 
Web Title: Molestation of girl in hospital