गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

अल्पवयीन मुलीला चहामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माणगाव (वार्ताहर) : अल्पवयीन मुलीला चहामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. दाेन आरोपी अल्पवयीन आहेत. 

अत्याचार झालेली १७ वर्षीय मुलगी माणगाव तालुक्‍यातील एका गावातील आहे. तिला चहामधून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध झाल्यानंतर अत्याचार करण्यात आले. या अत्याचाराचे छायाचित्रण मोबाईलमध्ये करून ती चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. ही मुलगी गर्भवती आहे. माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास माणगाव उपविभागीय पोलिस अधिकारी शशीकिरण काशीद हे करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: molestation on minor girl