मोखाड्यात आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचा विनयभंग; अधिक्षकाला अटक

मोखाड्यात आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचा विनयभंग; अधिक्षकाला अटक

मोखाडा :  मोखाडा तालुक्यातील आसे येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील  7 वी मध्ये शिक्षण घेणा-या 12 वर्षाच्या मुलीला घरकामाच्या निमित्ताने बोलावून, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचे निंद्यनीय कृत्य त्याच आश्रम शाळेचे अधिक्षक योगेश अमरसिंग चव्हाण याने केले आहे. या निंदनीय घटनेची फिर्याद येथील शिक्षीका दीक्षा दिलीप निंबारा या महिलेने मोखाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मोखाडा पोलीसांनी अधिक्षक योगेश अमरसिंग चव्हाण याला अटक केली असून ठाणे सेशन कोर्टाने चव्हाण यास पांच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  

आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा, आता सर्व सरकारी वाहने असणार इलेक्ट्रिक

या घटनेविषयी फिर्यादी दिक्षा निंबारा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मोखाडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आसे येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात निवासी शिक्षण घेत आहे. आरोपी योगेश चव्हाण हा निवासी वसतिगृहाचा अधीक्षक म्हणून नोकरी करतो. आरोपीने पीडित मुलीस घरातील भांडी धुण्यास बोलवले असता पीडित मुलगी आरोपीच्या घरात जाऊन भांडे घासून घराची फरशी पुशीत असताना, आरोपीने तिचा हात पकडून तीला तुझे कुणावर प्रेम आहे का? असे सांगून तिच्याशी अंगलट करून अश्लील संभाषण करु लागला. सदरचा प्रकार हा कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सदरची घटना आश्रमशाळेच्या आवारात 14 डिसेंबर ला घडली. दरम्यान, हा सर्व निंदनीय प्रकार शाळेतील एका महिला कर्मचार्याने बघितला, तीने ही घटना आपल्या सहकारी व वरिष्ठांना सांगितल्याने, घटनेचे बिंग फुटलं. तसेच सर्वत्र वाच्यता झाली.

मोखाड्यात आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचा विनयभंग; अधिक्षकाला अटक
'56 इंच' छाती असणारे PM मोदी जीममध्ये व्यायाम करतात तेव्हा...

अखेर 30 डिसेंबर ला या घटनेची तक्रार येथील शिक्षिका दिक्षा निंबारा यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. या फिर्यादी वरुन मोखाडा पोलीसांनी आरोपी योगेश चव्हाण विरोधात विनयभंग, अल्पवयीन मुलीवर अत्याचार ( पोस्को ) तसेच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून योगेश चव्हाण या नराधमाला अटक केली आहे. योगेश चव्हाण ला ठाणे सेशन कोर्टाने पांच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनाजी नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संजयकुमार ब्राम्हणे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com