तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

file photo
file photo

मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानकात तरुणीचा हात पकडून तिचा विनयभंग करणाऱ्यास वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली. मोहम्मद सलाउद्दीन शेख असे संशयिताचे नाव असून 2015 मध्येही त्याने विनयभंग केल्याची माहिती पीडित तरुणीने पोलिसांना दिली. 
शेख हा मूळचा पश्‍चिम बंगालमधील असून सध्या तो नळ बाजारात जुने कपडे विकतो. पीडित तरुणी घरी जाण्याकरिता सॅण्डहर्स्ट स्थानकात उभी असताना शेख तिथे आला. त्याने तरुणीकडे पाहून अश्‍लील हावभाव केले; मात्र तिने दुर्लक्ष केले आणि लोकल येताच ती महिला डब्यात बसली. शेखही शेजारील मालडब्यात बसला. त्याने पुन्हा तिच्याकडे पाहून इशारे करण्यास सुरुवात केली. वांद्रे स्थानक येताच तरुणी उतरून रिक्षा थांब्याकडे निघाली असता मागून अचानक आलेल्या शेखने तिचा हात पकडला. तरुणीने आरडाओरड करताच त्याने पळ काढला. त्यानंतर तिने वांद्रे पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत शेखला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com