"मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात मदतनिधी जमा होणार"

सुमित बागुल
Thursday, 5 November 2020

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. येत्या सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. महाविकास आघाडी सरकारकडून अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. येत्या सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. स्वतः महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

BIG NEWS - आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार, अर्णब गोस्वामी यांना तूर्तास दिलासा नाही

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली. येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय झाल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी तयार करायचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे गरजेचे आहे याचा पुनरुच्चार वडेट्टीवार यांनी  केलाय.

BIG NEWS  - अर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर, संजय राऊतांचा अमित शहांना टोला

याबाबत अधिक माहिती देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणालेत की, शेतकऱ्यांना महाविकास आघाडीने दिलेला शब्द, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडतील हा शब्द आम्ही पाळत आहोत. येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरवात होईल. आम्ही याबाबत राज्य निवडणूक आयोगाला देखील पत्र लिहून कळवलं आहे. अशा प्रकारचे पैसे वाटायचे असल्यास निवडणूक आयोगाची परवानगी महत्त्वाची आहे. या आधीही अशा परवानग्या मिळालेल्या आहेत, जिथल्या शेतकऱ्यांना मदतनिधी दिला जाणार आहे तिथे निवडणूका नाहीत, त्यामुळे ती परवानगी नक्कीच मिळेल आणि तिथे अडचण येईल असं मला वाटत नाही असेही वडेट्टीवार म्हणालेत. 
 

from this monday farmers will start getting relief fund minister vijay wadettiwar disclosed information


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: from this monday farmers will start getting relief fund minister vijay wadettiwar disclosed information