मुंबई, ता.23 : टॉप्स सेक्युरीटी घोटाळा प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची सक्तवसुली संचालनालय (ED) अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा चौकशी केली. विहंग सरनाईक दुपारी 12 वाजता दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. ईडी अधिकाऱ्यांनी तब्बल सहा तास त्यांची कसून चौकशी केली.
महत्त्वाची बातमी : संचारबंदीसाठी नवी मुंबई पोलिस सज्ज! प्रत्येक ठाण्यात 100 अतिरिक्त कर्मचारी
आजच्या चौकशीत टॉप्स ग्रूपचे अधिकारी आणि प्रताप सरनाईक यांच्या विश्वासू सहकाऱ्यामध्ये झालेल्या पैशाच्या व्यवहाराबद्दल ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न केल्याचे कळतेय. सोमवारी (21 डिसेंबर ) प्रताप सरनाईक यांच्या पुर्वेश आणि विहंग या दोन्ही मुलांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. प्रताप सरनाईक यांनाही चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी ईडीने समन्स बजावले आहेत.
महत्त्वाची बातमी : खबरदार ! मांजरींना पोसाल तर 500 रुपयांचा दंड
यापुर्वी 10 डिसेंबरला आमदार प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी झाली होती. 24 नोव्हेंबरला या आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबई, ठाण्यातील 10 कार्यालयात, टॉप्स ग्रूपशी संबधीत कार्यालये आणि राहूल नंदा यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. या छाप्यादरम्यान विहंग सरनाईक यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी प्रताप सरनाईक यांचे सहकारी अमित चांडोले, टॉप्स ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक एम शशीधरण यांनाही अटक करण्यात आली आहे.
ED चौकशीत कायम सहकार्य करणार असल्याचं या आधीच प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.
( संपादन - सुमित बागुल )
money laundering case tops group ed enquiry of pratap sarnaiks son vihang sarnaik conducted for six hours
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.