

Monkey on Borivali Railway Tracks Delays Local Train Services
esakal
मुंबई : मुंबईत गेल्या २४ तासांत अनेक भागांत १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली असून, मुसळधार पावसामुळे शहरातील काही सखल भागांत पाणी साचले. अंधेरी सबवेमध्ये पाणी शिरल्याने काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली. त्यातच बोरिवली स्थानकात रेल्वे रुळावर माकडाने ठाण मांडल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.