मोनो रेल अद्याप यार्डातच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

मुंबई - लोकल रेल्वेची गर्दी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मुंबईकर पुन्हा मोनो रेलकडे वळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मोनो रेल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ‘एल ॲण्ड टी’ कंपनीने तयारी दाखवली आहे.

‘एमएमआरडीए’कडून मात्र ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. मुंबईत पुन्हा मुंबईकरांच्या सेवेसाठी मोनो रेल कधी धावणार, हा प्रश्‍न आहे. 

नोव्हेंबर २०१७ पासून चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्यातील मोनो रेल म्हैसूर कॉलनी स्थानकात आग लागल्याने बंद आहे. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ‘एल ॲण्ड टी’ कंपनीने स्वारस्य दाखवले आहे. मोनो रेल्वेचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या ‘स्कोमो’ कंपनीनेही त्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे; मात्र त्याबाबत एमएमआरडीच्या पातळीवर हालचाली होत नसल्याने मोनो रेल पुन्हा सुरू होणे लांबणीवर पडले आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये मोनोरेलला म्हैसूर कॉलनी स्थानकामध्ये आग लागली. आगीत मोनोरेलचे दोन डबे खाक झाले. त्यामुळे एमएमआरडीएने ही सेवा बंद केली. त्यानंतर सुरक्षेचे कारण देत एमएमआरडीएने या मार्गावरची मोनोरेल सुरू करण्याची टाळाटाळ कायम ठेवली आहे. आगीच्या घटनेनंतर सुरक्षेसंबंधी आढावा घेतला. रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाने या घटनेची संपूर्ण चौकशी केल्यानंतर सुरक्षेच्या काही सूचना व्यवस्थापनाकडे केल्या. त्यानंतर सूचनांची पूर्तता होत मोनो रेल सुरू होईल, अशी आशा होती; मात्र आठ महिन्यांपासून मोनो रेलचे घोंगड भिजतच आहे, असे सध्याचे चित्र आहे.

अद्याप मोनो रेल सेवा पुन्हा सुरू करण्याचा कोणाताही विचार नाही. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर तो जाहीर केला जाईल. 
- दिलीप कवठकर, जनसंपर्क अधिकारी, एमएमआरडीए

Web Title: mono rail yard