काय ? उंदराच्या रक्तात तयार झालेल्या अँटीबॉडीज रोग्याच्या शरीरात, वाचा सविस्तर...

काय ? उंदराच्या रक्तात तयार झालेल्या अँटीबॉडीज रोग्याच्या शरीरात, वाचा सविस्तर...

मुंबई - कोरोनावर औषध सापडायला काही काळ जाईल असे सांगितले जात असतानाच जगभरातील संशोधकांनी मात्र औषधाच्या संशोधनावर भर दिला आहे. इस्त्राईल देशाने कोरोनाच्या विरोधात मोनोक्लोनल अँटीबॉडीज तयार केल्याचा दावा केला आहे. मात्र याचे पेंटट मिळवण्याचे काम इस्त्राईलकडून सुरु असून त्याआधी हे औषध उघड करण्यात येणार नसल्याची माहीती सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे यांनी दिली. 

इस्त्राईल या देशाने कोरोनाच्या विरोधात मोनोक्लोनल अँटी बॉडी तयार केल्याचा दावा केला आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीज तंत्र म्हणजे शरीरात जनुकीय दृष्ट्या एकाच प्रकारच्या अँटीबॉडीजच्या प्रति निर्माण करणे असे डॉ. रंजन गर्गे यांनी सांगितले. एखादा विषाणू मानवी शरीरात संक्रमित झाला म्हणजे माणसाच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती अँटीबॉडीज तयार करते. अशा प्रकारच्या अँटीबॉडीज प्रयोगशाळेत वाढवून रोग्याला टोचणे असे हे तंत्र आहे.

कोणत्याही पेशींची जनन क्षमता अमर्याद असते. म्हणून उंदिरमधील बी लिम्फोसाईट आणि कॅन्सरची पेशी यांच्या मिलनातून प्रयोगशाळेत तिसऱ्या प्रकारच्या पेशी तयार केल्या जातात. यांना हायब्रीडोमा असे म्हणतात. हायब्रीडोमा पेशीमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता तर असतेच पण त्यांना अमर्याद जननक्षमता देखील प्राप्त होते.

"कोरोना प्रतिबंधावर प्रत्येक संशोधन हे वैश्विक असणार आहे. प्रत्येक देशातील सूक्ष्मजीव संशोधक कामाला लागले आहेत. त्याचा फायदा प्रत्येक देशाला होणार आहे." - डॉ. रंजन गर्गे, सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ 

अशा हायब्रीडोमा पेशी रोग्याच्या शरीरात पाहिजे तेवढ्या मात्रेत टोचल्या जातात. या इंग्रजी वाय आकाराच्या अँटीबॉडीज विषाणूच्या पृष्ठभागावरील स्पाइक प्रथिनेला चिकटतात आणि त्या विषाणूला फुप्फूसाच्या पेशीत प्रवेश करण्यास मज्जाव करतात आणि संक्रमण रोखले जातात. 

उंदरावर प्रयोग - 

यात उंदराला हा विषाणू टोचून त्याच्या रक्तात  लिम्फोसाईट पेशी तयार होतात. या पासूनच पुढे अँटीबॉडीज तयार होतात. अँटीबॉडीज हे वाय आकाराचे इम्युनो ग्लोब्युलिन प्रथिने असते. अशा उंदराच्या रक्तात तयार झालेल्या अँटीबॉडीज रोग्याच्या शरीरात टोचल्या जातात. परंतु ते व्यवहार्य नाही. कारण अँटीबॉडीज मिळण्यासाठी असे किती उंदीर मारणार ? हा देखील प्रश्न आहे. 

monoclonal technique is used to make covid 19 antidote read full news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com