

Monorail Ticket Price Hike
ESakal
मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या आठ-नऊ -महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल लवकरच सुरू होणार आहे. एमएमआरडीएने मोनोरेलमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे वाढीव खर्च भरून काढण्यासाठी एमएमआरडीएने सध्या असलेले १०-४० रुपये तिकीट १०-७० रुपये करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत; मात्र राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच त्याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.