esakal | तूर्तास पाणीकपात नाही, जुलैअखेरिस महापालिकेकडून पाणीसाठ्याचा आढावा
sakal

बोलून बातमी शोधा

water condition

तूर्तास पाणीकपात नाही, जुलैअखेरिस महापालिकेकडून पाणीसाठ्याचा आढावा

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : पावसाने मुंबईसह (Monsoon in Mumbai) धरण क्षेत्रांकडे पाठ फिरवल्याने पाणीसाठा (Water level) कमी होऊ लागला आहे. सध्या तलावांमध्ये 68 दिवसांचा पाणीसाठा आहे. मात्र, तुर्तास पाणी कपातीची शक्‍यता नाही. जुलै महिन्याच्या (July month end) अखेरीस पाणीसाठ्याचा आढावा (water checking) घेऊन पुढील नियोजन करण्याचा निर्णय महानगर पालिकेने (BMC) घेतला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या 2 लाख 63 हजार 631 दशलक्ष लिटर साठा आहे. आवश्‍यक साठ्याच्या 18 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्याच्या परीसरीस्थीतीत हा साठा 68 दिवस पुरू शकेल एवढा असला तरी संपूर्ण जून महिना जवळ जवळ कोरडा गेल्याने पाणीसाठ्यात अपेक्षीत वाढ झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पाणीकपातीची चर्चा सुरु झाली आहे. मात्र,तुर्तास पाणी कपातीचा विचार नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Monson Condition in Mumbai BMC will Check water condition in July end)

या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.त्यामुळे तत्काळ पाणी कपात करण्याचा विचार नाही.महिना अखेरीस पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले.

- सध्याच्या पाणीसाठा - 2 लाख 63 हजार 631 दशलक्ष लिटर

-वर्षभरासाठी आवश्‍यक पाणीसाठा - 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर

- रोजचा पाणीपुरवठा - 3 हजार 900 दशलक्ष लिटर

हेही वाचा: गर्भवती महिलांनो, 'आरएच' विसंगतीकडे गांभीर्याने बघा - डॉ.रिषमा धिल्लन पै

पाणीसाठा(दशलक्ष लिटर) व तलावाची पातळी (मिटर)

तलाव - आवश्‍यक पातळी - सध्याची पातळी - पाणीसाठा

अप्पर वैतरणा - 603.51---592.61---00

मोडकसागर - 163.15---151.13---41293

तानसा - 128.63---122.55----44619

मध्य वैतरणा - 285.00----240.80---22092

भातसा - 142.07----114.50----132909

विहार - 80.12---77.99----16817

तुळशी - 139.17---137.50----5901

loading image