
मुंबई : मुंबईत पावसाळी आजारांचे सावट वाढले आहे. पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये मलेरियाचे सर्वाधिक १२९४ रुग्ण आढळले, तर डेंग्यूचे ७०५, हेपॅटायटीस १७६ आणि लेप्टोचे ११४ रुग्ण आढळले. पावसाळी आजारांचा वाढता प्रादुर्भाव पाहता, डॉक्टरांनी लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगण्यास आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी सतर्क राहण्यास सांगितले आहे.