Mumbai Metro : प्रवाशांना तत्पर सेवेसाठी मुंबई मेट्रोचे मान्सून कंट्रोल रूम

प्रवाशांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे कंट्रोल रूम कार्यरत राहणार असून प्रशिक्षित कर्मचारी २४ तास इथे कार्यरत
monsoon mumbai metro devices measure wind speed 24x7 control room
monsoon mumbai metro devices measure wind speed 24x7 control roomSakal

मुंबई : पावसाळ्यात मेट्रोने प्रवास करताना प्रवाशांचा विनाव्यत्यय प्रवास सुनिश्चीत करण्याच्या दृष्टीने महा मुंबई मेट्रोने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून चारकोप मेट्रो डेपोमध्ये २४ तास कार्यरत असणारे मान्सून कंट्रोल रूम स्थापित करण्यात आले आहे.

प्रवाशांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे कंट्रोल रूम कार्यरत राहणार असून प्रशिक्षित कर्मचारी २४ तास इथे कार्यरत असतील. जे हवामानामुळे उद्भवणारी अनपेक्षित परिस्थिती तसेच प्रवास दरम्यानचा व्यत्यय तत्काळ सोडवण्यास मदत करतील. आपत्कालीन परिस्थितीत कंट्रोल रूम सोबत संपर्क साधण्यासाठी 1800 889 0505 / 1800 889 0808 हे टोल फ्री क्रमांकाची सुविधा पुविण्यात आलेकी आहे.

monsoon mumbai metro devices measure wind speed 24x7 control room
Mumbai Murder Case: वसतिगृहे 'असुरक्षित' च नव्हे; तर ती जीवघेणी, महिला नेत्यांचा संताप

आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन, बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन केंद्र (BMC), पोलिस नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका सेवा आणि अग्निशमन दलासोबत मुंबई मेट्रोच्या मान्सून कंट्रोल रूमचा हॉटलाइन क्रमांक थेट जोडलेला आहे. ज्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत उपरोक्त संस्थांसोबत तत्काळ समन्वय साधून समस्येचे तत्काळ निरसन करता येईल.

monsoon mumbai metro devices measure wind speed 24x7 control room
Mumbai Metro : मुंबई मेट्रोचे प्रवाशांना मिळणार विमा सुरक्षा कवच

वाऱ्याची गती व दिशा यांची नोंद करणारे ॲनिमोमीटर यंत्र आणि सीसीटीव्ही यंत्रणा मेट्रो मार्ग २अ आणि ७ च्या प्रत्येकी ५ अशा एकूण १० स्थानकांवर वाऱ्याची गती व दिशा यांची नोंद करणारे ॲनिमोमीटर यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

या यंत्राच्या साहाय्याने वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेतला जाईल. ज्यामुळे मुंबई मेट्रोला वाऱ्याच्या स्थितीचे बारकाईने निरीक्षण करून मेट्रोची सेवा विनाव्यत्यत कार्यान्वित ठेवणे सुरक्षित आहे की नाही हे ठरवता येईल.

monsoon mumbai metro devices measure wind speed 24x7 control room
Metro Neo : ‘मेट्रो निओ’साठी गंगापूर शिवारात मिळेना जागा; 3 एकराचा मोकळा भूखंड देण्याची NMCची तयारी

प्रवाशांच्या सुरक्षिततेत दक्षता राखण्यासाठी महा मुंबई मेट्रोने प्रत्येक मेट्रो स्थानकांवर किमान ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, ज्यात प्लॅटफॉर्म, रस्त्यालगत असलेला भाग याचा समावेश आहे. या कॅमेरांचे मॉनिटरिंग २४ तास कार्यान्वयन नियंत्रण केंद्र आणि सुरक्षा नियंत्रण कक्षाद्वारे केले जाणार आहेत, ज्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचे निरसण करण्यासाठी उशीर होणार नाही.

महा मुंबई मेट्रो मुंबईकर नागरिकांना विना व्यत्यय तसेच सुरक्षित प्रवास सुविधा पुरविण्यासाठी कटीबद्ध आहे. मान्सून कंट्रोल रूम ही आधुनिक तंत्रज्ञानाने प्रशिक्षित कर्मचारी यांनी सज्ज आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाश्यांना त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचण्यास विलंब होणार नाही याची खबरदारी म्हणून इतर सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेमध्ये व्यत्यय आल्यास महा मुंबई मेट्रो कडून गरजेनुसार अतिरिक्त मेट्रो सेवा चालवण्याची तयारी करण्यात आलेली आहे.

-डॉ. संजय मुखर्जी, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com