Mumbai News : अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा भरण्याच्या स्थितीत; मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटणार

अप्पर वैतरणा धरणाची पूर्ण भरण्याची पातळी 603.51 मीटर आहे. सद्या हे धरण 601.32 मीटर इतके भरले
अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा
अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणाsakal

मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करण्या-या तानसा, मोडकसागर, तुळशी आणि विहार ही धरणे भरली असून त्यापाठोपाठ आता अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा ही दोन धरणे भरण्याच्या स्थितीत असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली आहे.

अप्पर वैतरणा धरणाची पूर्ण भरण्याची पातळी 603.51 मीटर आहे. सद्या हे धरण 601.32 मीटर इतके भरले आहे. तर मध्य वैतरणाची पूर्ण भरण्याची पातळी 285 मीटर इतकी असून सद्या ते 283.53 मीटर भरले आहे.

हळूहळू या दोन्ही धरणांचा पाणीसाठा वाढत आहे. तलाव क्षेत्रात जोरदार सरी झाल्यास ती धरणे आठवड्याभरात भरतील, असा विश्वास जलअभियंता विभागाने व्यक्त केला आहे. भातसा धरणाची पूर्ण भरण्याची पातळी 142.07 मीटर इतकी आहे.

हे धरण भरण्याला उशीर लागेल. अजून सहा ते सात मीटर इतका पाणी पातळी वाढण्याची गरज आहे, अशी माहिती या विभागाने दिली आहे. तुळशी, विहार, तानसा आणि मोडकसागर ही चारही धरणे पूर्णपणे भरली आहेत.

त्यामुळे पाणी मुंबईत लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात पालिका प्रशासनाने रद्द केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सद्या मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सर्व 12 लाख एक हजार 524 दशलक्ष लिटर इतका जलसाठी उपलब्ध आहे. हा साठा 83.01 टक्के इतका साठा उपलब्ध असल्याची जलअभियंता विभागाने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com