मोरबे धरणात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा
मोरबे धरणात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा

मोरबे धरणात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा

नवी मुंबई : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे शहराचा पाणीप्रश्‍न मिटणार आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात १२ महिने म्हणजेच नोव्हेंबर २०२० पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करता येईल एवढा जलसाठा शिल्लक आहे, अशी माहिती मोरबे धरण प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पुढील वर्षभर शहर जलसंपन्न असणार आहे. 

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण सलग तिसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे. मागील ९८ वर्षांनंतर प्रथमच धरण परिसरात जवळजवळ पाच हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे; तर शहरातही मागील अनेक वर्षांत प्रथमच पावसाने ४६३८.२९ मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे ९८ वर्षांतील सर्वाधिक पाऊस धरण परिसरात झाला असून, मोरबे धरणात नोव्हेंबर २०२० पर्यंत पुरेल एवढा जलसाठा जमा झाला आहे. यंदा पावसाला सुरवात झाली, तेव्हा धरणात ४० टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे पालिकेकडून शहरात सुरवातीला १० टक्के पाणीकपातदेखील सुरू करण्यात आली होती; तर जून महिन्यात अत्यंत कमी पाऊस पडल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा जमा होईल की नाही याबाबत प्रशासन चिंतेत होते. परंतु, जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्याने व ऑगस्ट महिन्यातील पावसाने धरण पूर्ण भरले. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १९०.८९ एवढी असून धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण क्षमतेने भरते. तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर मोरबे धरणाची पाटबंधारे विभागामार्फत पाहणी करण्यात आली होती. तेव्हा धरण मजबूत असल्याचे व नवीन अभियंत्यांना पाहण्यासाठी हे धरण दाखवण्याची शिफारस करण्यात आली होती. शहरात २४ तास पाणीपुरवठा करणारे देशातील नवी मुंबई हे महत्वाचे शहर आहे. 

नवी मुंबई शहर हे मोरबे धरणामुळे जलसंपन्न झाले आहे. सद्यस्थितीत नोव्हेंबर २०२०पर्यंत पुरेल एवढा जलसाठा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे शहराला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करता येईल. एवढा जलसाठा धरणात उपलब्ध आहे.
- मनोहर सोनावणे, कार्यकारी अभियंता, मोरबे प्रकल्प.

दृष्टिक्षेप
धरण पातळी : ८८.२० मीटर.
एकूण जलसाठा : १८१.९९४ दशलक्षघमी.
गेल्या वर्षी पडलेला पाऊस : ३३२८.२० मिमी.
या वर्षी पडलेला पाऊस : ५२४६.२० मिमी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com