‘ऑपरेशन प्लॅकफेस’! विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वावरावर सायबर भामट्यांची नजर; शिक्षकांचीही होतेय फसवणूक

‘ऑपरेशन प्लॅकफेस’! विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वावरावर सायबर भामट्यांची नजर; शिक्षकांचीही होतेय फसवणूक



मुंबई : कोरोना संकटात सध्या शाळाही ऑनलाईन झाल्यामुळे शिक्षकांना ऑनलाईन त्रास देण्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशा 30 तक्रारी सायबर विभागाला प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय मुले ऑनलाईन असताना त्यांची ऑनलाईन फसणूक आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीची भीतीही निर्माण झाली आहे. सायबर विभागाने त्यासाठी ‘ऑपरेशन प्लॅकफेस’ ही मोहीम सुरू केली आहे. त्याअंतरर्गतही कारवाई करून सुमारे 150 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोव्हिडमुळे मुलांचा ऑनलाईन वावर वाढल्यामुळे सायबर विभागाने सायबर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राकेश क्रिपलानी यांच्या मार्गदर्शनाखाली सावधान@ऑनलाईन या ऑनलाईन जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात राज्यातील 165 शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी उपस्थित होते. 
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाईन जनजागृती कार्यक्रमात क्रिपलानी यांनी मार्गदर्शन केले. 
कोरोना संकटाच्या काळात सामान्य नागरीकांसह शाळांमध्येही सायबर सुरक्षेची मोठी आवश्यकता आहे. मानसिक सिद्धांत व कृती यांच्या मदतीने सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणता येऊ शकते, असे मत उप महानिरीक्षक (सायबर विभाग) हरीश बैजल यांनी मत व्यक्त केले.
1947 पासून 2020 पर्यंत संपर्काच्या माध्यमांमध्ये प्रचंड बदल झाला आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्येही बदल झाला आहे. सध्याच्या काळात सायबर अडथळे, पीढींमधील मानसिक स्थितीती बदल, व्हिडीओ अथवा मोबाईल गेमचा मुलांवरील परिणाम हे महत्त्वपूर्ण ठरत आहेत. अशा स्थितीत सुरक्षेसाठी सायबर सुरक्षेसह सायबर मानसिकताही जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे सायबर मानसोपचार तज्ज्ञ डॉ.  क्रिपलानी यांनी सांगितले.

राज्यात 30 शाळा व महाविद्यालयांच्या प्रतिनिधींनीकडून सायबर विभागाला अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.   ऑनलाईन वर्गादरम्यान शिक्षकांना त्रास देण्याच्या घटना घडत आहेत. त्याबाबत जागृती सायर विभागाकडून करण्यात आली. याशिवाय राज्यात ‘चाईल पॉर्नोग्राफी’ विरोधात सायबर विभागाने राबवलेल्या ऑपरेशन ब्लॅकफेसचीही माहिती यावेळी देण्यात आली.

ऑपरेशन ब्लॅकफेस अंतर्गत कारवाई
ऑपरेशन ब्लॅकफेस अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत 150 हून अधिक गुन्हे दाखल झाले होते. त्यात 48 व्यक्तींना भा.दं.वि. कलम 292 सह कलम 14,15 पोस्को व 67,67 अ,67 ब आय.टी. अॅक्ट अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे.या 135 प्रकरणांपैकी एक आयपीसी कलम 292 अंतर्गत अकोला येथे दाखल करण्यात आले होते. त्याशिवाय पॉस्को अंतर्गत पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, परभणी, पुणे, नागपूर 42 प्रकरणे, तर माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत  मुंबई, कोल्हापूर, अमरावती, अहमदनगर, रायगड, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, गोंदिया, बीड, भंडारा, परभणी, नंदुरबार, चंद्रपूर, लातूर, ठाणे  ग्रामीण, अमरावती ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, हिंगोली, नवी मुंबई, धुळे, पालघर, नाशिक ग्रामीण, जालना, वाशिम, सातारा, जळगाव, पुणे ग्रामीण, बुलढाणा, नागपूर ग्रामीण, वर्धा, ठाणे, सांगली, रत्नागिरी, यवतमाळ आणि लातूर  या जिल्ह्यांमध्ये 92 गुन्हे दाखल करण्यात आले होते.

अशी काळजी घ्या

  • -आपली मुले जेव्हा इंटरनेट सर्फ करतात तेव्हा पालकांनी सतर्क असावे
  •  -एकत्र ऑनलाइन वेळ व्यतीत करा जेणेकरुन मुले तुमच्याकडून योग्य ऑनलाइन वर्तन जाणतील. मुले वापरतात तो संगणक / टॅब  अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जिथे पालकही पाहू शकतात. स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर घालवलेल्या वेळेवर लक्ष ठेवा. चाईल्ड लॉक चा वापर करा.
  • -कोणत्याही अपरिचित अकाउंट शुल्कासाठी क्रेडिट कार्ड / फोन बिलांबद्दल सावधानता बाळगावी. मुलांच्या आवडीच्या साइट बुकमार्क करणे चांगले. आपल्या मुलांची शाळा,  मित्र/मैत्रीणींची  घरे किंवा मुले जेथे आपल्या देखरेखीशिवाय संगणक वापरू शकतील अशा कुठल्याही ठिकाणी ऑनलाइन संरक्षण काय आहे ते शोधा
  • - तुमच्या पाल्यांनी इंटरनेटवर आलेल्या वाईट अनुभवाबद्दल तुम्हाकडे तक्रार केली तर  ती गंभीरपणे घ्या.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com