मुंबईत 2 लाखांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त, बरे होण्याचा दर 85 टक्क्यांवर

मिलिंद तांबे
Thursday, 15 October 2020

मुंबईत बुधवारी 2,211 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,34,606 झाली आहे. मुंबईत काल 48 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा 9,552 वर पोहोचला आहे. मुंबईत काल 3,370 रुग्ण बरे झाले.

मुंबई: मुंबईत बुधवारी 2,211 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,34,606 झाली आहे. मुंबईत काल 48 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा 9,552 वर पोहोचला आहे. मुंबईत काल 3,370 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 2 लाख 1 हजार 497 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 85 टक्के इतका झाला आहे.

बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 11,122 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल करण्यात येणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. बुधवारी कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 1,047 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबईत 650 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,799 इतकी आहे. 

अधिक वाचाः  Mumbai Rain Updates: मुंबई, ठाण्यासह रेड अलर्ट, पुढचे २४ तास सतर्क राहा

मुंबईत काल नोंद झालेल्या 48 मृत्यूंपैकी 44 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 29 पुरुष तर 19 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 48 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होते. 11 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 35 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

अधिक वाचाः  मुंबईतील जन्मदरात झाली घट, मृत्युदर वाढला; यामागची करणं काय ?

 बुधवारी 3,370 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 2,01,497 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 73 दिवसांवर गेला आहे. तर 13 ऑक्टोबर पर्यंत एकूण 12,93,994  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 7 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.95 इतका आहे.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

More than 2 lakh patients in Mumbai are corona free recovery rate at 85 per cent


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than 2 lakh patients in Mumbai are corona free recovery rate at 85 per cent