पुन्हा सुरु होणार संशोधन; 11 महिन्यांपासून गावी गेलेले तब्बल विद्यार्थी IIT Bombay मध्ये परतलेत

पुन्हा सुरु होणार संशोधन; 11 महिन्यांपासून गावी गेलेले तब्बल विद्यार्थी IIT Bombay मध्ये परतलेत
Updated on

मुंबई : कोरोनाचा प्रभाव मुंबईसह देशभरात कमी होत असल्याने मागील अकरा महिन्यांपासून आयआयटी मुंबई मधील विद्यार्थी आपल्या गावी गेले होते. तब्बल दोन हजाराहून अधिक विद्यार्थी आता आयआयटी मुंबईत आपल्या शिक्षण आणि संशोधनसाठी परतले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे शेवटचे वर्ष आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्यातील हे विद्यार्थी आहेत. परतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईच्या वसतिगृहात राहण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे आयआयटी कडून सांगण्यात आले.

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना आपल्या प्रकल्पावर खूप वेळ  द्यावा लागतो. मात्र कोरोनामुळे विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळालेला नाही नाही. म्हणून आयआयटी प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहात राहण्याची आणि उपलब्ध असलेल्या शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा आदी वापरण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती आयआयटी मुंबईचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी दिली. 

कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आत्तापर्यंत आयआयटी मुंबईतील सर्व अभ्यासक्रम हे ऑनलाईन आणि इतर त्याच धर्तीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून सुरू आहेत. आता महाराष्ट्रात विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालये सुरू होत असल्याने आयआयटी मुंबईतील पूर्ण वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याची आम्ही तयारी केली आहे. स्थानिक प्रशासनाने आदेश दिल्यानंतर हे वर्ग सुरू केले जाणार आहेत. यामुळे जे विद्यार्थी आपल्या गावाहून आयआयटी मुंबईतील वसतिगृहात पोचले आहेत, त्यांना कोरोनाचे नियम पाळून आणि त्यासाठीची काळजी घेऊन त्याचे प्रत्यक्ष वर्ग सुरू केले  जातील.

आयआयटी मुंबईच्या संकुलात  विद्यार्थ्यांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. शिवाय जे विद्यार्थी वर्गात प्रत्यक्षात उपस्थित राहणार आहेत, त्यांच्यामध्ये योग्य ते सोशल डिस्टन्स ठेवण्यात येणार आहे. वर्गात उपस्थित राहण्यापूर्वी  विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि मास्क सक्तीचे करण्यात येणार आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 4 कोटींचा निधी जमा करण्यात आला होता. या निधीमधून 762 विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना टेक्निकल हार्डवेअर विकत घेण्यासाठी आयआयटी मुंबईकडून मदत देण्यात आली आहे.

more than 2 thousand students returned to IIT bombay after covid spread decreased

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com