Mumbai : विधानसभेला अजून भाई उतरतील, लोकसभा हे तर ट्रेलर ; मनसे आमदार राजू पाटील

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून येत्या काही दिवसांतच आचारसंहिता लागण्याची चिन्हे
Mumbai
Mumbai Esakal

डोंबिवली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. मित्रपक्ष एकमेकांना आव्हान देत असतानाच मनसेच्या आमदारांनी एक विधान केले आहे. आमदार राजू पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुका हे तर ट्रेलर आहे. विधानसभेत तुम्ही पहा अजून भाई उतरतील असे म्हणत त्यांनी महायुतीतील सर्वच नेत्यांना टार्गेट केले आहे.

Mumbai
Yoga Tips : शरीरात थकवा जाणवतोय? मग, रोज करा 'ही' योगासने, रहाल तंदूरूस्त आणि उत्साही

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून येत्या काही दिवसांतच आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. त्यातच जागा वाटपावरून महायुतीमधील मित्रपक्षांचा अद्याप ताळमेळ बसलेला दिसत नाही.

Mumbai
Oily Skin Tips : तेलकट त्वचेसाठी मॉईश्चरायझरची निवड करताय? मग, चेहऱ्यावर लावताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

जागावाटप वरून महायुती मधील तिन्ही पक्षामध्ये रस्सीखेच चालू आहे. केसाने आमचा गळा कापू नका; भाजप नेत्यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनी इशारा दिला आणि लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडली.मोदी शहांकडे बघून आम्ही भाजपमध्ये आलो आहोत. मात्र, पुन्हा विश्वासघात झाल्यास माझे नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी भाजप नेतृत्वाला दिला आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरही रामदास कदम यांनी तोफ डागली होती.तर दुसरीकडे शिंदे गटाला जेवढ्या जागा दिल्या जातील, तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केली... यावरून जागावाटप वरून महायुती मधील तिन्ही पक्ष समोरासमोर उभे असून एकमेकांना आव्हान करत आहेत.

Mumbai
Yoga Tips : ‘या’ योगासनांचा सराव प्रत्येक गृहिणीने करायलाच हवा, तंदूरूस्तीसाठी आहे फायदेशीर

असे असताना मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी महायुतीमधील सर्वच नेत्यांना टोला हाणला आहे. ते म्हणाले, हा खरं तर त्यांचा विषय आहे. आम्हाला त्यामध्ये पडायची गरज नाही. परंतु लोकसभा इलेक्शन हे ट्रेलर आहे. विधानसभेला अजून भाई उतरतील यांच्यातील आणि अजून ह्यांची भांडण होणार आहेत. आम्हाला यांच्या राजकारणात रस नाही.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com