esakal | मोठी बातमी - मुंबईतील तब्बल ५३४३ नागरिकांची नावं High Risk Contact यादीत- राजेश टोपे
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी - मुंबईतील तब्बल ५३४३ नागरिकांची नावं High Risk Contact यादीत- राजेश टोपे

MOH टीमने हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या लोकांची यादी आली जारी केली आहे. चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील ५३४३ जणांची नावं या यादीत High Risk Contact या विभागात आहेत

मोठी बातमी - मुंबईतील तब्बल ५३४३ नागरिकांची नावं High Risk Contact यादीत- राजेश टोपे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईमध्ये नॉवेल कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या Covid19 चे  सर्वाधित पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत आहेत. अशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची डोकेदुखी वाढवणारी बातमी आता समोर येतेय. स्वतः महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे.  

HDFC ग्राहकांनो कर्जाचा हफ्ता पुढे ढकलायचाय; जाणून घ्या 'सर्व' माहिती...

MOH टीमने हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या लोकांची यादी आली जारी केली आहे. चिंताजनक बाब म्हणजे ५३४३ जणांची नावं या यादीत High Risk Contact या विभागात आहेत. राजेश टोपे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'आपत्कालीन विभाग' म्हणजेच डिझॅस्टर मॅनेजमेंट विभागाला भेट दिली. यावेळी टोपे यांनी कोरोनाशी सामना करण्याच्या दृष्टीने उभारलेल्या यंत्रणेचा आढावा घेतला.

यानंतर राजेश टोपे यांनी प्रासारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी सदर माहिती माध्यमांसमोर ठेवली आहे. दरम्यान प्रशासनाकडून आता याप्रकरणी महत्त्वाची पावलं उचलली जातायत. या  5,343 हाय रिस्क कॉन्टॅक्टवर नजर ठेवण्यासाठी 4 हजार जणांचं पथक संपूर्ण मुंबईत कार्यरत असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलंय. 

भीषण ! ना मास्क, ना ग्लोव्ज; इथं नागरिकांना लॉकडाऊन संपलाय असं वाटतंय बहुदा

डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा 

कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे. कोरोनाशी लढणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी युद्धातील आघाडीवरचे सैनिक अशी उपमा दिली असून जीवाची बाजी लावून समाजसेवेसाठी हे अतुलनीय शोर्य दाखविताना न थकता हे काम सुरू असल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी यासर्वांना मानाचा मुजरा करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. 

more than five thousand citizens are in high risk contacts says health minister rajesh tope

loading image