मुंबई : विजयादशमीचा उत्साह, देवींच्या मूर्तींचे विसर्जन आणि राजकीय पक्षांचे दसरा मेळावे, या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात गुरुवारी (ता. २) कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. या वेळी शहरात २० हजारांहून अधिक पोलीस मनुष्यबळ मुंबईच्या रस्त्यांवर असेल.