
Mount Mary Festival
ESakal
मयूर फडके
मुंबई : माउंट मेरी म्हणजेच मोत माउलीच्या जत्रेला आजपासून सुरुवात होत आहे. या जत्रेला वांद्रे महोत्सव असेही म्हटले जाते. रविवार (ता. १४) ते रविवार (ता. २१)पर्यंत जत्रा सुरू असणार आहे. या जत्रेला १०० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. येथे दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. माउंट मेरी चर्चमध्ये नवस मागण्यासाठी तथा मेणबत्ती लावून नवस फेडण्यासाठी भाविक गर्दी करतात. यंदाच्या वर्षी एक लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता चर्च व्यवस्थापनाकडून वर्तवली आहे.