
कल्याण : लोक अदालतमध्ये वाहतूक पोलिस विभागाचे १० हजार ३२८ प्रकरणे निकाली
कल्याण : रस्त्यावरील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या (Traffic rules) वाहनचालकांना वाहतूक पोलिस ई-चलनमार्फत (E-Challan) दंड ठोठावतात. मात्र, अनेक वाहनचालक दंड भरतच नाहीत. त्यामुळे अशा वाहनचालकांनी दंड भरावे (Fine) यासाठी नुकतीच राष्ट्रीय लोक अदालतीचे (National peoples court) आयोजन कल्याणमध्ये करण्यात आले होते. यात कल्याण-डोंबिवलीमधील तीन वाहतूक पोलिस ठाण्यातील (Traffic Police) १० हजार ३२८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून सुमारे ४१ लाख ६७ हजार ४३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा: रोता क्यू है, म्हणत नालासोपाऱ्यात माथेफिरूंची पादचाऱ्याला मारहाण, Video व्हायरल
कल्याण-डोंबिवली शहरात कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व आणि डोंबिवली असे तीन वाहतूक पोलिस ठाणी आहेत. या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर बेशिस्त आणि नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ई-चलन द्वारे दंड आकारला जातो. मात्र, अनेक जण ही दंडाची रक्कम भरत नाही. अशा वाहन चालकांना नोटीस बजावत राष्ट्रीय लोक अदालतमध्ये हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. ही राष्ट्रीय लोक अदालत, तालुका विधी सेवा समिती कल्याण येथे आयोजित आयोजित करण्यात आली होती. यात १० हजार ३२८ केस निकाली काढण्यात आल्या व संबंधित वाहनचालकांकडून एकूण ४१ लाख ६७ हजार ४३० रुपये दंड वसूल करण्यात आला.
वाहतूक पोलिस ठाणे केस दंडाची वसूल रक्कम
कोळशेवाडी २ हजार ७४१ ११ लाख ४० हजार ५५० रुपये
कल्याण पश्चिम ४ हजार २० १६ लाख ७३ हजार २५० रुपये
डोंबिवली ३ हजार ५६७ १३ लाख ५३ हजार ६३० रुपये
Web Title: More Than Ten Thousand Traffic Police Cases Solved In National Peoples Court Traffic Police Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..