esakal | बापरे! मुंबईत डॉक्टरांनी त्यांच्या पोटातून बाहेर काढले १३.५० कोटीचे ड्रग्ज

बोलून बातमी शोधा

Drugs

बापरे! मुंबईत डॉक्टरांनी त्यांच्या पोटातून बाहेर काढले १३.५० कोटीचे ड्रग्ज

sakal_logo
By
अनिश पाटील, प्रतिनिधी

मुंबई: महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने(डीआरआय) पकडलेल्या दोन टान्झानियन नागरीकांच्या पोटातून 151 ड्रग्सच्या कॅप्सुल बाहेर काढण्यात जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. आरोपीकडून उच्च प्रतिचे कोकेन हस्तगत करण्यात आले असून त्याची किंमत साडे तेरा कोटी रुपये आहे. मट्वांझी कार्लोस अॅडम व रशिद पाऊल सायुला या दोन टान्झानियन नागरीकांना डीआरआयने माहितीच्या आधारावर ताब्यात घेतले होते.

दोघेही टान्झानियाच्या दर-ए-सलाम येथून 22 एप्रिलाल मुंबईत आले होते. त्यावेळी न्यायालयाच्या परवनगीने दोघांनाही जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी एक्स रेमध्ये दोघांच्याही पोटात काही संशयित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉक्टरांनी सहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर दोघांच्याही पोटातून ड्रग्सच्या कॅप्सुल बाहेर काढल्या. अॅडमच्या पोटातून 54, तर सायुला याच्या पोटातून 97 कॅप्सुल काढण्यात आल्या आहेत त्यातून पांढ-या रंगाची पावडर सापडली असून तपासणी ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्राला ऑक्सिजनची गरज, IIT मुंबईने करुन दाखवलं

54 कॅप्सुलमधून 810 ग्रॅम कोकेन सापडले आहे, तर 97 कॅप्सुलमधून 1415 ग्रॅम कॅप्सुल सापडले आहे. दोनही मिळून एकूण दोन किलो 225 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत 13 कोटी 35 लाख रुपये असल्याचे अधिका-यांनी सांगितले. याप्रकरणी दोघांनाही गुरूवारी अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यात डीआरआयने ड्रग्सच्या कॅप्सुल गिळून तस्करी करणा-या तिघांना अटक केली आहे. त्यामुळे कोकेनला भारतीय बाजारात किती मागणी आहे. हे यावरून स्पष्ट होत आहे