एकट्या मुंबईतून आल्यात इतक्या मद्यविक्रीच्या ऑनलाईन ऑर्डर्स..., मुंबईकरांची मद्याची 'प्यास हैं बडी'

एकट्या मुंबईतून आल्यात इतक्या मद्यविक्रीच्या ऑनलाईन ऑर्डर्स..., मुंबईकरांची मद्याची 'प्यास हैं बडी'

मुंबई- अखेर मुंबईत ऑनलाईन मद्यविक्रीला सुरूवात होताच मद्यविक्रेत्यांचं आर्थिक गणित सुरळीत दिशेनं सुरु झालं आहे. सोमवारी महाराष्ट्रासह मुंबईत  ऑनलाईन मद्यविक्रीला सुरुवात झाली. त्यात एकट्या मुंबईत ऑनलाईन ऑर्डरचा सपाटा लागला आहे. सोमवारी 49,373 एकूण ऑनलाईन ऑर्डर देण्यात आल्या. त्यापैकी 24,615 या ऑनलाईन ऑर्डर मुंबईतून आल्या आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं यासंबधित माहिती दिली आहे. 

मुंबई शहर हे रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव लक्षात घेता सरकारनं बिअर आणि वाइन शॉपची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये म्हणून सरकारकडून ही घोषणा करण्यात आली. यामुळे मुंबईत दारुची विक्री करण्यास मनाई करण्यात आली. मात्र लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थितीही कोलमडली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची आर्थिक परिस्थिती ढासळली. त्यासाठी ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी दिली. त्यातच मुंबई जिल्हा हा दारूची होम डिलिव्हरीसाठी परवानगी देणारा हा शेवटचा जिल्हा होता. 

राज्यात ऑनलाईन मद्यविक्रीस 15 मे रोजीपासूनच परवानगी देण्यात आली होती. मात्र परवानगी मिळाल्यानंतर मुंबईत सोशल डिस्टन्सिंगचे तेरा वाजल्यानं महापालिकेनं मुंबईतल्या मद्यविक्रीस बंदी आणली. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी सरकारनं मुंबईत ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. 

उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, 23 मे रोजी ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी मुंबईत 3,062 ऑर्डर देण्यात आल्या. 24 मे रोजी ही संख्या 18,964 होती आणि सोमवारी ऑनलाईन ऑर्डरचा आकडा 24,615 वर पोहोचला.

मुंबईत एकूण 1,190 किरकोळ दारूची दुकाने आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत यापैकी 4२4 आणि परवानाधारक दुकानांपैकी 36 टक्के दुकानांनी आवश्यक परवाना घेतल्यानंतर घरपोच मद्यविक्री केली आहे. 

या ऑर्डरची घरपोच विक्री येत्या आठवड्याभर सुरु राहील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करीत आहोत, असं वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. अशा काही अटी आहेत ज्या स्टोअरच्या मालकानं होम डिलीव्हरी करण्यापूर्वी त्याचं पालन करणं आवश्यक आहे. यामध्ये होम डिलिव्हरी करणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी करून घेणे आणि त्यांना विभागाकडून ओळखपत्रे मिळवणे यांचा समावेश असल्याचं दुसऱ्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. 

मोठ्या शहरांमध्ये होम डिलिव्हरी पर्याय अधिक लोकप्रिय झाला आहे. अधिकाऱ्याच्या मते, 15 मेपासून देण्यात आलेल्या 3,31,655 ऑर्डर या बऱ्याचशा मोठ्या शहरातून आल्या आहेत. 4 मे रोजीपासून सुरु झालेल्या मदयविक्रीमुळे विभागानं आतापर्यंत 292.15 कोटींचा महसूल मिळवला असल्याची माहिती मिळाली आहे. 

ऑनलाईन मद्यविक्रीचे नियम आणि अटी 

  • जिल्हा प्रशासनाने मद्य विक्रीस परवानगी दिलेल्या जिल्ह्यातच ऑनलाईन मद्य विक्री करता येणार आहे.
  • तुमचा जिल्हा जर रेड झोनमध्ये असेल तर त्या जिल्ह्यात मद्यविक्री होणार नाही. 
  • घरपोच मद्यसेवा देण्याची जबाबदारी सर्वस्वी दुकानदारावर असणार आहे.
  • घरपोच सेवा देणारे कामगार यांची वैद्यकीय तपासणी करुन ते वैद्यकीयदृष्टया पूर्णपणे पात्र ठरल्यासच त्यांना विभागातर्फे तसे ओळखपत्र देण्यात येईल.
  • संबंधित घरपोच सेवा देणाऱ्या कामगारांना मास्क, हेड कॅप, हातमोजे, हॅन्ड सॅनिटायझर आणि वारंवार हातमोजे निर्जतुक करण्यासाठी सोडीयम हायपोक्लोराईडचाचा वापर करणं अनिवार्य आहे.
  • घरपोच सेवा देणाऱ्या प्रत्येक दुकानात जास्तीत जास्त 10 कामगाराच काम करतील.
  • सरकारच्या आदेशानुसार सदयस्थितीत घरपोच मद्यसेवा ही कोविड-19 लॉकडऊन कालावधीच करताच लागू असेल.
  • मद्य बाळगणे, वाहतूक करणे इ. मद्यसेवन परवान्यातील तरतूदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची संबंधित दुकानदारांनी दक्षता घ्यावयाची आहे.
  • सरकारचे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणं दुकानदार, Delivary boy आणि ग्राहकास बंधनकारक असणार आहे.

more than twenty four thousand online orders of home delivery of liquors received from mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com