सीवूडसमध्ये डास वाढले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

सीवूडसमध्ये डासांचा उपद्रव वाढला आहे. संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी वा मुलांना उद्यानात घेऊन जाणारे पालक डासांमुळे त्रस्त झाले आहेत. पालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या धूरफवारणीत सातत्य नसल्याने अशा त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

नवी मुंबई : सीवूडसमध्ये डासांचा उपद्रव वाढला आहे. संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी वा मुलांना उद्यानात घेऊन जाणारे पालक डासांमुळे त्रस्त झाले आहेत. पालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या धूरफवारणीत सातत्य नसल्याने अशा त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

वातावरणात गारवा वाढला की डासांचा उपद्रवही वाढतो; मात्र पालिका प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना केल्यास डासांचा उपद्रव कमी होऊ शकतो. पालिका प्रशासनाचे डासांच्या उपद्रवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सीवूडसमध्ये सेक्‍टर-५०, सेक्‍टर-४८, ४६, सेक्‍टर-४२, ४४, ४४ ए, ४० येथे मोठ्या प्रमाणावर डासांचा उपद्रव वाढला आहे. संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी निघणाऱ्या नागरिकांना अर्ध्या रस्त्यावरूनच परत फिरावे लागत आहे. काही क्षण निवांत बसावे म्हटले तरी डोक्‍यापासून पायापर्यंत डासांचा चावा बसत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. "ज्वेल ऑफ नवी मुंबई'सह सूवूडसमधील संत ज्ञानेश्वर माऊली उद्यान, क्रांतिसिंह नाना पाटील उद्यान व इतर उद्यानामध्येही संध्याकाळी साडेसहानंतर जाणे कठीण झाले आहे, अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. 

उद्यानांमधील अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे अगोदरच मुलांचा हिरमोड झालेला असतो. त्यातच डासांचा उपद्रव, दहा मिनिटेही उद्यानात थांबणे अशक्‍य होते. मलेरिया, डेंगीच्या भीतीने मुलांना घेऊन आल्या पावलीच घरी परतावे लागते. 
- सरिता ठोमरे, स्थानिक नागरिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mosquitoes grew in seawoods