मुंबईत मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कळवायेथे एका मातेने आपल्या18 वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार(ता. 9)ला सकाळी घडली.

कळवा : कळवायेथे एका मातेने आपल्या18 वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार(ता. 9)ला सकाळी घडली.

कळवा बाजारपेठ परिसरातील गौरीसुमन सोसायटी मध्ये दुसऱ्या माळ्यावर राहणारे प्रशांत पारकर हे सकाळी नेहमी प्रमाणे व्यायामशाळेत व्यायाम करण्यासाठी गेले असता त्यांची पत्नी प्रज्ञा पारकर आणि मुलगी श्रुती या दोघीच घरी होत्या. सकाळी आठच्या सुमारास प्रज्ञा हिने (वय 39) यांनी आपली मुलगी श्रुती(वय 18)ही झोपेत असताना तिचा गळा दाबून तिची हत्या केली व त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली.

प्रशांत घरी आल्यावर त्यांना धक्काच बसला. कळवा परिसरात सुशिक्षित कुटुंबात झालेल्या या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली असून या हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र घटनास्थळी आईने लिहीलेली चिठ्ठी मिळाली असून 'ही हत्या मी केली असून त्यासाठी कोणाला जबाबदार धरू नये' असे प्रज्ञा यांनी लिहिल्याची माहिती कळवा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली. कळवा पोलिस या संदर्भात अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother commits suicide by killing girl at mumbai