आईने गळा दाबून केली मुलाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

नवऱ्यापासून विभक्त राहत असल्याच्या मानसिक त्रासातून एका महिलेने स्वतःच्या मुलाला गळा दाबून जीवे मारल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडली आहे.

बदलापूर : नवऱ्यापासून विभक्त राहत असल्याच्या मानसिक त्रासातून एका महिलेने स्वतःच्या मुलाला गळा दाबून जीवे मारल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडली आहे. शीतल मनेर (35) असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. बदलापूर पूर्वेकडील शिरगाव भागात गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.

या भागातील सुरभी अपार्टमेंट या इमारतीत राहणाऱ्या शीतल मनेर (35) या महिलेने स्वतःच्या 8 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या केली. शीतल व तिचे पती वैभव यांच्यात पटत नसल्याने गेल्या दीड वर्षांपासून ती बदलापूर येथील सुरभी अपार्टमेंट या इमारतीत बहिणीसोबत राहत होती. चार दिवसांपूर्वी बहीण बाहेरगावी गेल्याने शीतल व तिचा मुलगा अर्णव दोघेच घरी होते. त्या वेळी झोपेत असलेल्या अर्णवचा गळा दाबून तिने हत्या केली.

याप्रकरणी शीतल मनेर हिच्याविरोधात बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. तिला 28 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक हर्षल कुलकर्णी यांनी दिली. याप्रकरणी कुलकर्णी अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother kills child in throat