

Doctors Achieve Success in Critical Kidney Transplant Case
esakal
विरार : आधुनिक किडनी उपचार क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश नोंदवत मीरा रोड येथील वॉकहार्ट हॉस्पिटल्समध्ये 28 वर्षीय युवकावर अत्यंत गुंतागुंतीची आणि उच्च जोखमीची एबीओ-असंगत (रक्तगट न जुळणारी) किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. सदर युवक एंड-स्टेज रीनल डिसीज (किडनी निकामी होण्याची अंतिम अवस्था) आणि क्रॉनिक इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिक पर्पुरा (ITP) या गंभीर आजारांनी ग्रस्त होता. यापूर्वी त्याची प्लीहा (स्प्लीन) काढण्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याचा प्लेटलेट काउंट केवळ २५,००० इतका घसरला होता, जो अत्यंत धोकादायक मानला जातो. त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्रावाचा मोठा धोका निर्माण झाला होता.यामध्ये आणखी एक मोठे आव्हान म्हणजे आई आणि मुलाचा रक्तगट वेगळा होता. तरीही आईने किडनी दान करण्याचा धाडसी आणि निस्वार्थ निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळेच उपचार प्रक्रियेला नवी दिशा मिळाली.