

Motivational Stories of Tribal youth Nayan Wagh
ESakal
टोकावडे : मुरबाड तालुक्यातील ऐनाची वाडी येथील आदिवासी तरुण नयन विठ्ठल वाघ याने ‘स्वप्न पाहा आणि त्यासाठी झटत राहा’ हे वाक्य प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत नयन याने अनुसूचित जमाती प्रवर्गात राज्यात १५वा क्रमांक मिळवत तालुक्याचा आणि आदिवासी समाजाचा मान उंचावला आहे. दारिद्र्य, अपयश आणि संकटांवर मात करून त्याने यश मिळवले आहे.