

Rickshaw Drivers Daughter Became CA
ESakal
शहापूर : घरची परिस्थिती बेताची, म्हणावे तसे शैक्षणिक वातावरणही नाही; पण कष्ट घेण्याची तयारी असेल, तर तुम्ही आकाशालाही गवसणी घालू शकता, हे शहापूरसारख्या छोट्या शहरात राहणाऱ्या साक्षी खरे हिने सिद्ध केले. जिद्द आणि चिकाटीवर ती सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याने रिक्षाचालक असलेल्या वडिलांची मेहनत सार्थक ठरल्याची अनुभूती घेत आहेत.