मोटरसायकल-कारचा अपघातात एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

पाली - पाली-रवाळजे मार्गावर दिघेवाडी फाट्याजवळ मोटरसायकल व कार यांच्यात शुक्रवारी (ता. 3) सायंकाळी 7 वाजता अपघात झाला. या अपघातात मोटरसायलस्वाराचा मृत्यू झाला.

संदीप बेलोसे (रा. नेणवली) हे शुक्रवारी (ता. 3) सायंकाळी मोटरसायकलवरून रवाळजेला जात होते. या वेळी दिघेवाडी फाट्याजवळ रवाळजेहून येणाऱ्या कारची समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक बसली. यामध्ये मोटरसायकस्वार संदीप बेलोसे यांच्या डोक्‍याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच सुरेश खैरे, अरिफ मनियार आदींसह गावकऱ्यांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. पाली-रवाळजे माणगाव मार्ग सुस्थितीत आहे; परंतु या मार्गावर रिफ्लेक्‍टर व पांढरे पट्टे लावण्यात आलेले नाहीत. धोकादायक वळणाच्या या रस्त्यावरून वाहनचालकास मार्ग काढणे कठीण होते. समोरून वेगात येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात होतात. सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावर रिफ्लेक्‍टर व पांढरे पट्टे लावण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एस. शिर्के करीत आहेत.

Web Title: Motorcycle-Car accident; one death