Mumbai Accident: मुंबईत पुन्हा हिट अॅन्ड रन! तरुण कामावर निघाला; पण वाटेतच घात... घटना समजताच कुटुंबानं हंबरडा फोडला
Navi Mumbai Accident: खारघर येथे हिट अॅन्ड रनची घटना घडली आहे. एका भरधाव जीपने मोटारसायकल चालकाला धडक देऊन तेथून पळ काढला. सीसीटीव्हीत संपूर्ण थरार कैद झाला असून जीप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : तळोजा येथील नावडे गावातून खारघर येथे कामाला निघालेल्या मोटारसायकल चालकाला भरधाव जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.