मुली आणि महिलांना आकर्षित करतात 'हे' गेम्स

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

मुंबई - भारतात तब्बल ६० टक्के लोकांकडे मोबाईल फोन आहेत. त्यातही स्मार्ट फोन असणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. मोबाईलवर अनेकांना ऑनलाइन गेम्स खेळायला खूप आवडतात. काहीजण वेळ घालवण्यासाठी गेम्स खेळत असतात तर काही आवड म्हणून खेळत असतात. आपल्या स्मार्टफोन्समध्ये हजारो गेम्स प्लेस्टोरवर असतात.

मुंबई - भारतात तब्बल ६० टक्के लोकांकडे मोबाईल फोन आहेत. त्यातही स्मार्ट फोन असणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. मोबाईलवर अनेकांना ऑनलाइन गेम्स खेळायला खूप आवडतात. काहीजण वेळ घालवण्यासाठी गेम्स खेळत असतात तर काही आवड म्हणून खेळत असतात. आपल्या स्मार्टफोन्समध्ये हजारो गेम्स प्लेस्टोरवर असतात.

एका आकडेवारीनुसार ऑनलाईन गेम्स खेळणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एका गेमरचं सरासरी वय हे ३४ आहे. एक गेमर सरासरी एका आठवड्यात १०-१२ तास ऑनलाइन गेम खेळतो. विशेष म्हणजे तब्बल ४५ टक्के महिलांना गेम्स खेळण्याची सवय आहे. त्यामुळे एक नजर टाकुयात महिलांना कोणते ऑनलाईन आणि मैदानी गेम खेळायला आवडतात यावर.  

मोठी बातमी - चीनहून परतली, अन् 'कोरोनो' घेऊन आली!'

कोणत्या प्रकारचे गेम्स आहेत लोकप्रिय :

एआर- वीआर गेमिंग:

ऑनलाइन गेम खेळता-खेळता शरीराची हालचाल व्हावी म्हणून एआर-वीआर गेमिंगचा पर्याय शोधून काढण्यात आला. रिअल टाइमचा अनुभव घेण्यासाठी या पर्यायाला महिलांमध्ये पसंती मिळते. एआर-वीआर गेमिंग मुळे आपलं आरोग्य धोक्यातही येऊ शकतं किंवा आजारांना निमंत्रण मिळतं. पॉकेमॉन गो, हॅरी पॉटर: विझार्डस युनाइट, रोलर कोस्टर,ब्लु व्हेल हे गेम्स यात येतात.

सोशल मीडिया गेमिंग :
 
सोशल मीडियावर गेमिंगचं प्रमाण अधिक आहे. फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन खेळता येऊ शकणारे गेम्स आहेत. सोशल मीडियावर गेम्स खेळणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. फार्म-विले, माफिया वॉर्स, झुमा ब्लिट्झ याप्रकरचे गेम्स सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. हे गेम्सदेखील महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. 

मोठी बातमी - पाकिस्तानी एजंटचा ई-मेल, ७ जण भारतात करणार दहशतवादी हल्ला...

क्लाऊड गेमिंग :

हे गेम्स सतत डिमांडमध्ये असतात. या प्रकारचे गेम्स मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेट कुठेही खेळले जाऊ शकतात. या गेम्सला इंटरनेट कनेक्शन लागत नाही. एकदा डाउनलोड करून घेतल्यानंतर हे गेम्स कधीही खेळले जाऊ शकतात. सबवे सर्फर, टेंपल रन, कँडी क्रश इत्यादी गेम्स महिलांमध्ये जास्त प्रमाणात खेळले जातात. महिलांना हे देखील गेम्स प्रचंड आवडतात. ट्रेनमधून किंवा प्रवासादरम्यान अनेक महिला या गेम्सना पसंती देतात. 

स्पोर्ट्स गेम्स :

महिलांना स्पोर्ट्स गेम्ससुद्धा खेळायला आवडतात. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गेम्स यामध्ये येतात. त्यामुळे या गेम्सना समजून घेण्यासाठी आणि त्यांचा अनुभव घेण्यासाठी बहुतांश महिला हे खेळ खेळतात. बास्केटबॉल लीग, रग्बी, आर्चरी, कुस्ती, शूटिंग बॅटल, टेनिस अशा प्रकारचे स्पोर्ट्स गेम्स मोठ्या प्रमाणावर खेळले जातात.

मोठी बातमी - "डोनाल्ड ट्रंप यांनी शिवभोजन थाळीचा रांगेत उभं राहून आस्वादही घेतला असता"

भारतीय गेम्स :

महिलांना भारतीय गेम्स खेळायला सर्वाधिक आवडतात. आधीच्या काळात हे गेम्स मैदानावर किंवा घराबाहेर खेळले जात होते. मात्र आता आता हे सर्व गेम्स मोबाईलवर उपलब्ध आहेत. त्यामुळे महिलांनी अशा गेम्सला त्यांची पहिली पसंती दिली आहे. कबड्डी, खो-खो, गल्ली क्रिकेट, कॅरम, विटी-दांडू  इत्यादि भारतीय गेम्स सगळ्यात जास्त खेळले जातात.

indian women and girls are attracted towards these games read full report


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian women and girls are attracted towards these games read full report