esakal | नाट्यगृहे, चित्रपटगृहांना प्रेक्षक संख्येची अट नको- डॉ. अमोल कोल्हे | MP Dr Amol Kolhe
sakal

बोलून बातमी शोधा

MP Amol Kolhe

नाट्यगृहे, चित्रपटगृहांना प्रेक्षक संख्येची अट नको- डॉ. अमोल कोल्हे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकारने (mva government) २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे (theatre) ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी (permission) दिली आहे; परंतु या बंधनामुळे मनोरंजनसृष्टीला (entertainment) फटका बसेल. त्यामुळे नाट्यगृह आणि चित्रपटगृहांत प्रेक्षक मर्यादा नसावी. ती शंभर टक्के उपस्थितीत सुरू करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (dr amol kolhe) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(cm uddhav Thackeray) यांना पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा: झोपण्याच्या जागेवरून बेघर कामगाराची भिवंडीत हत्या

५० टक्के उपस्थितीचा नियम नाट्य व्यवसायाच्या मुळावर घाव घालणारा आहे. नाटक व चित्रपट हे कौटुंबिक मनोरंजनाचे साधन आहे. त्यामुळे सहकुटुंब नाटक पाहायला जाणारे प्रेक्षक या नियमामुळे नाटक, चित्रपट पाहायला जाणारच नाहीत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ५० टक्के क्षमतेने प्रयोग करणे आर्थिकदृष्ट्याही परवडणारे नाही, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.

तसेच, चित्रपटगृहांत एक सीट सोडून बैठकव्यवस्था करण्याऐवजी सलग बैठक व्यवस्थेस परवानगी दिल्यास आधीच डबघाईस आलेल्या मनोरंजन व्यवसायाला दिलासा मिळेल. त्यामुळे या क्षेत्रावर उपजीविका असलेल्या हजारो कलावंत, तंत्रज्ञ, कर्मचारी आदींनाही मदत होईल. यासाठी १०० टक्के आसन क्षमतेसह थिएटर सुरू करण्याची सुधारित नियमावली जाहीर करण्याची विनंतीही कोल्हे यांनी केली आहे.

loading image
go to top