Vidhan Sabha 2019 : संजय केळकर यांच्या प्रचारासाठी खासदार मनोज तिवारी मैदानात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात.

ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन उत्तर भारतीय मतदारांना केले.

मनोज तिवारी ठाण्यात आल्याने त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. स्वतः मनोज तिवारी यांनी मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केल्यामुळे उत्तर भारतीयांची मते देखील केळकर यांच्याच पारड्यात पडणार असल्याने केळकर यांचा विजय आणखी सोपा झाला आहे.  भाजप-शिवसेना-रिपाइं-रासप-शिवसंग्राम महायुतीचे १४८ ठाणे मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार संजय मुकुंद केळकर यांची प्रचार मंगळवारी सायं.४.३० वाजता  ढोकाळी नंदीबाबा मंदिर येथुन प्रारंभ करण्यात आला.  

त्यानंतर ही रॅली - रुनवाल पर्ल - रुनवाल एस्टेट - कृष्णा हॉटेल - मनोरमा नगर   शंकर मंदीर - हनुमान मंदीर - मराठी शाळा- पेट्रोल पंप - रॉय मास्टर - शिवाजी नगर - साईबाबा मंदीर - मानपाड़ा मार्केट - खेवरा हाउस - जैन मंदीर रोड - स्मशान भूमी रोड - विट्ठल रखुमाई मंदीर - गणेश नगर - दशरथ पाटील मैदान - मढ़वी चाल - आज़ाद नगर - शाखा शाळा क्र 55 - शीतला माता मंदीर - जीवन संग्राम मैदान या मार्गावर काढण्यात आली होती. 

या रॅलीला वेगळे महत्व प्राप्त झाले होते ते मनोज तिवारी हे रॅलीत सहभागी झाल्यामुळे. ही प्रचार रॅली मनोरमानगर येथील शंकर मंदिराजवळ आल्यानंतर तिवारी यांनी या ठिकाणी छोटेखानी भाषण देखील केले. या भाषणात त्यांनी संजय केळकर यांना आपल्या खास शैलीत निवडून देण्याचे आवाहनदेखील केले. "मनोजवा आये तोहरे द्वारवा और फार आयेगी महायुती की सरकार वा असे भोजपुरीमध्ये वाक्य उच्चारल्यानंतर त्यांच्या या वाक्याला रॅलीमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संजय केळकर यांच्यासाठी मी खास ठाण्यात आलो असून, महायुतीचे सरकार आणण्यासाठी केळकर यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या रॅलीमध्ये खासदार राजन विचारे, महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यसह नगरसेवक मधुकर पावशे, भूषण भोईर,नगरसेविका पदमा ताई भगत हेमंत  पवार(ठाणे विधानसभा प्रमुख),राजेंद्र शिंदे (विभागप्रमुख) उपविभाग प्रमुख हिंदूराव देशमुख,यशवंत भगत, चंद्रकांत केसरे, किसन पागी, महादेव घरत, विश्वनाथ बारस्कर, शाखा प्रमुख लहू पाटील, विट्ठल डोंगर,बलीराम मढ़वी,संतोष शिर्के, देवानंद भगत, जेष्ठ नेते आनंदा केसरी,तानाजी जगताप, बालासाहेब मोरे युवा सेना अधिकरी: मिलिंद चव्हाण भाजपा नेते सुरेश कोलते,रमाकांत पाटील, जयनाथ पूर्णेकर,एकनाथ मढ़वी,सूरज दलवी,चंद्रमा चौहान,प्रदीप पूर्णेकर,छत्रपति पूर्णेकर,बबलू मिश्रा,दत्ता गाडगे ,अमीत पाटील, मत्स्यगंगा पवार ,शांताराम चौधरी,संभाजी बेलोटे आदि मान्यवर उपस्थित होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Manoj Tiwari in Thane for Election Campaign Maharashtra Vidhan Sabha 2019