
Suresh Mhatre
ESakal
भिवंडी : भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून मुंबई नाशिक महामार्गावर वडपा ते खारेगाव या महामार्गाच्या २४ किलोमीटर अंतराच्या रस्त्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, हा रस्ता बनवणाऱ्या ठेकेदारांने देशातील जनतेच्या पैशांवर डल्ला मारला असून या नादुरुस्त रस्त्यामुळे रस्ते अपघातात अनेकांचा जीव गेला असून अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे या ठेकेदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे.