esakal | महावितरणचे कर्मचारी काढून नेतायत मिटर
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

महावितरणचे कर्मचारी काढून नेतायत मिटर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : कळंबोली (Kalamboli) परिसरामध्ये थकित विजबिल असलेल्या ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना देता महावितरण (MSEB) कंपनीचे कर्मचारी परस्पर मीटर (MITER) काढून नेत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांची घरातील बत्ती (Light) गुल होताना दिसत आहे. असे प्रकार कळंबोली (Kalamboli) मध्ये वारंवार घडत असल्याचा आरोप मनसेचे (MNS) कळंबोलीतील नेते नितीन काळे (Nitin Kale) यांनी केला आहे. कोरोना (corona) महामारी च्या पाश्वभूमिवर गेली दोन वर्षे अनेक नागरिकांच्या नोकरी व्यवसायावर गदा आली आहे. त्याच बरोबर हाॅटेल व्यावसायिक, छोटे व्यापारी, यांच्या सह सर्वसामान्य नागरिकही आर्थिक बजेट बसवण्यात हतबल झाले आहेत.

अशातच महावितरणकडून वीज प्रवाह खंडित करून मीटर काढण्याचा जोरदार सफाटा पनवेल परिसरात सुरू आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी कळंबोली येथील मनसे चे नेते नितिन काळे दिल्या आहेत. त्या अनुषंगाने नितिन काळे व कळंबोली येथील मनसे पदाधिकारी कळंबोली येथील महावितरण च्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी लक्ष घालून कर्मचाऱ्यांनी योग्य सूचना द्याव्यात असे सांगून मनसेच नितीन काळे यांनी वीज वितरण कंपनीला इशारा दिला आहे.

हेही वाचा: लाईट का बंद केली, असा जाब विचारत महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण

एका महिन्याच्याचे वीजबील थकल्या नंतर बिल दिल्यानंतर पंधरा दिवसात बिल नाही भरले तर विज पुरवठा खंडीत करण्याच्या सुचना कर्मचार्यांना केल्या आहेत. त्या अनुषंगाने कर्मचारी त्यांच्या कामाच्या वेळेत विद्युत पुरवठा खंडीत करतात किंवा मिटर काढून आनतात.
गोकुळ सोनवणे
सहाय्यक अभियंता विद्युत वितरण कंपनी कळंबोली

loading image
go to top