esakal | कर्जतमध्ये वीज ग्राहकांना धक्का !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कर्जतमध्ये वीज ग्राहकांना धक्का !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्जत : तालुक्यात महावितरणची (MSEDCL) तब्बल नऊ कोटी ५० लाखाची वीज बिल थकबाकी आहे. या वसुलीसाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत पाच हजार २०० ग्राहकांचे मीटर (Meeter) काढून वीज पुरवठा (Electricity) खंडित केला आहे. कर्जत (Karjat) तालुक्यात महावितरणचे ७६ हजार ३४ ग्राहक आहेत. त्यांच्याकडून दर महिन्याला वीज बिलापोटी सरासरी आठ कोटी ३४ लाखांची वसुली अपेक्षित आहे. गेल्या वर्षापासून कोरोनाचे (Corona) कारण पुढे करत अनेक ग्राहकांनी वीज बिल थकविले.

त्यामुळे महावितरणच्या पेण मंडळाच्या आदेशानुसार वसुलीसाठी आक्रमक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार जुलैमध्ये सात कोटी १७ लाख वीज बिल वसुली करण्यात आली आहे.

सेवा देताना तत्परता का नाही ?

कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, तर काहींचे उत्पन्न घटले. त्यामुळे वीज बिल भरण्यास आर्थिक अडचण आहे, असे काही वीज ग्राहकांचे म्हणणे आहे. महावितरण वीज वसुली बाबत जेवढी तत्परता दाखवते तेवढी तत्परता वीज प्रवाह खंडित झाल्यावर पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी का दाखवत नाही. विजेचे अनेक खांब गंजून कोसळण्याची वेळ येते, तरी त्याकडे दुर्लक्ष का केले जाते, याकडेही ग्राहकांनी लक्ष वेधले आहे.

हेही वाचा: महावितरण कंपनीची आर्थिक घडी विस्कटली, ग्राहकांनी थकवले 693 कोटी

वीज ग्राहकांनी बिलाची रक्कम वेळेवर भरून महावितरणला "" सहकार्य करावे. त्यामुळे ग्राहकांना बिलावरील व्याजदराचा भुर्दड टाळता येईल. तसेच वीज प्रवाह खंडित करण्याची वेळ येणार नाही. ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार कर्जत तालुक्यात सुमारे साडेनऊ हजार विजेचे खांब आहेत. मागील काळात यातील जीर्ण धोकादायक खांब बदलण्यात आले आहेत. फक्त जेमतेम पाचशे खांब बदलण्याचे काम शिल्लक आहे.

प्रकाश देवके, उप कार्यकारी अभियंता, महावितरण

loading image
go to top