मोक्याचे भूखंड विक्रीतून 15 हजार कोटी निधी उभा करण्याचा MSRDC चा प्रस्ताव

मोक्याचे भूखंड विक्रीतून 15 हजार कोटी निधी उभा करण्याचा MSRDC चा प्रस्ताव

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या उभारणीला गती देण्यासाठी आता मुंबईसह इतर शहरातील मोक्याचे भूखंड दिर्घ मुदतीच्या भाडे करारावर देण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये नेपियन सी रोड, वांद्रे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि पुणे-कोल्हापूर मार्गासह इतर सर्व भूखंडाचा समावेश आहे. या माध्यमातून सुमारे 15 हजार कोटी रुपये उभारले जाणार आहेत. त्यासाठी लवकरच एमएसआरडीसी बोर्डापुढे हा प्रस्ताव ठेवल्या जाणार असून, मंजुरीनंतर त्यावर अंमलबजावणी होणार आहे.

समृध्दी महामार्ग बांधणीपासून ते अनेक महत्वाचे प्रकल्प  एमएसआरडीसीचे हाती घेतले आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी निधीची कमतरता पडू नये. यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या मालकीचे भूखंड 50 ते 60 वर्षाच्या लिजवर देण्याची योजना महामंडळाने आखली आहे. हा प्रस्ताव सध्या विचारधीन असून, लवकरच संचालक मंडळापुढे ठेवला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. लिलाव प्रक्रीयेसाठी मालमत्ता क्षेत्रालील अग्रगण्य कंपनी जेएलएल इंटरनॅशनल प्रापर्टी कन्सलन्टंटला काम दिले आहे. संचालक मंडळाने प्रस्तावाला मंजूरी दिल्यावर लिलाव प्रक्रीया सुरु केली जाणार आहे.

नेपीयन्सी रोडवरील महामंडळाच्या मालकीच्या भूखंडाचे दर मागवण्याची प्रक्रीया गेल्या ऑगस्ट महिन्यात सुरु केली होती. मात्र त्यावेळी मालमत्ता क्षेत्रात मंदिसदृष्य वातावरण असल्यामुळे प्रक्रीया पुढे ढकलण्यात आली होती. वांद्रे भागातील एक महत्वाचा भूखंड लवकरचं महामंडळाच्या ताब्यात येणार असून तो  लिजवर दिला जाणार आहे. मुंबई शहरात अनेक वर्षापासून एवढ्या मोठ्या भूखंडाचा लिलाव झालेला नाही. मात्र कोरोना परिस्थितीमुळे या लिलावाला कितपत प्रतिसाद मिळेल याबद्दल जाणकारांनी साशंकता व्यक्त केली आहे. महामंडळाने या भूंखडाच्या विक्रीतून 15 हजार कोटीचे उत्पन्नाचे टार्गेट ठेवले आहे. मात्र सध्याची परिस्थिती बघता, हे लक्ष्य़ पुर्ण होईल का हे सांगता येत नाही असही मालमत्ता क्षेत्रातील जाणकांराचे म्हणणे आहे.

( संपादन - सुमित बागुल )

MSRDC proposes to raise Rs 15000 crore from sale of strategic plots

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com