मुंबई : एसटीच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या लालपरीला चांगली पसंती मिळत आहे. ४ वर्षांनी एसटीने नवीन २६४० लालपरी बसेस घेतल्या. त्यापैकी ३१ विभागात मिळून तब्बल १५०० एसटीच्या ताफ्यात दाखल झालेले आहेत. उर्वरित बसेस ऑगस्ट अखेरपर्यंत मिळतील असा अंदाज आहे अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आषाढी एकादशी बरोबरच गणपती उत्सव आणि दिवाळीमध्ये प्रवाशांना या नव्या बसेस मधून प्रवास करण्याचा आनंद लुटता येणार आहे.