
मुंबई : यंदाच्या दिवाळी पर्वात एसटी महामंडळाने दरवर्षीची हंगामी भाडेवाढ रद्द केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई एसटी प्रशासनाने प्रमुख मार्गावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. महत्त्वाच्या मार्गावर बस हाऊसफुल्ल धावत असून, बसस्थानक प्रवाशांनी भरलेले आहे.