

MSRTC employees receive a Diwali bonus of ₹10,000 along with a two per cent DA hike.
esakal
मुंबई, : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांची सण उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून तो ५८ वरून ६० टक्के करण्यात आला आहे.