

MSRTC High Revenue Through Online Payment
ESakal
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून फोन पे, गुगल पे व तत्सम यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील आकडेवारीनुसार एसटी महामंडळामध्ये दररोज लाखोंच्या संख्येने यूपीआय व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण होत आहेत. या चार महिन्यांत एसटीला डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून ३०० कोटींचा महसूल मिळाला आहे.