
राजीव डाके
ठाणे : ठाणे एसटी विभागात साडेपाच वर्षात तब्बल ६१९ वाहक, चालक, कर्मचारी निवृत्त झाले आहेत. तर पुढील सहा महिन्यात आणखी ५१ जण निवृत्त होणार आहेत. त्यामुळे बस चालकांच्या अपुऱ्या संख्येमुळे अधिकाऱ्यांना वाहतुकीचे व्यवस्थापन करणे कठीण जात असून लांब पल्लल्यांच्या गाड्या रद्द करणे भाग पडावे लागत आहे. परिणामी वाहतूकीचे नियोजन करणारे अधिकारी आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ लागले असून ठाणे विभागाची एसटी वाहतूक कोलमडून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.